Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धनश्री ग्रुप तर्फे अंगणवाडी मदतनिसांना साडी-चोळी भेट व सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी – अहेरी तालुका मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे देचलीपेठा सर्कलमधील संपूर्ण अंगणवाडी मदतनीस सेविकांना जेष्ठ पौर्णिमा व आगामी वर्षावासाचे औचित्य साधून नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहणारे धनश्री ग्रुप आलापल्ली तर्फे साडी-चोळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

अहेरी तालुक्यातील देचलीपेठा हा आदिवासी बहुल अति दुर्गम, मागासलेला भागामध्ये अंतर्भूत आहे. या भागात नोकरी करणे म्हणजे युद्धपातळीवरील काम आहे. पावसाळ्यात तर या भागातील लोकांचा नदी, नाल्यामुळे 3 ते 4 महिने जगाशी संपर्क तुटतो. या परिसरात अशिक्षततेचा प्रमाण मोठया प्रमाणावर दिसून येते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा परिस्थितीतही कोरोनाचा पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीस मुलांना गोळा करून शिकवण्याचं काम करतात हे कौतुकच. इथूनच बालकाचे पाया मजबुत करण्याचं काम होतं असतो.

याची दखल घेत धनश्री ग्रुप चे मुख्य संचालक राजअनिल पोचमपल्लीवार व सहसंचालक गौरव भगत यांच्याकडून जेष्ठ पौर्णिमा व आगामी वर्षावासाचे औचित्य साधून देचलीपेठा सर्कल येथील संपूर्ण अंगणवाडी मदतनीस यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्याचे परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन व अंगणवाडी मदतनीस व सेविकांनी धनश्री ग्रुप चे आभार मानले. यावेळी देचलीपेठा सर्कल येथील पर्यवेक्षिका सुशीला भगत तसेच पूर्ण अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

हे देखील वाचा :

परीचारीका संघटनेच्या मागण्या तत्वता मान्य

नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 

 

Comments are closed.