Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

1971 युद्धातील महार बटालियन च्या वीर जवानांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, 25 जानेवारी: 1971 साली भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात 13 व्या महार बटालियनच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत हे युद्ध जिंकून थाणपीर टेकडी आपल्या ताब्यात घेतली. याठिकाणी भारताचा ध्वज पडकवला, या युद्धाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर या युद्धात पराक्रम गाजवणार्‍या सुभेदार मेजर रामभाऊ इंगळे, सुभेदार गोवर्धन गवई, हवालदार साहेबराव मिसाळ, हवालदार बाळू साखरे या वीर जवानांसोबत सिंधू रमेश जाधव, पुष्पा विनोद पैठणे या विरपत्नी व विमल ज्ञानदेव पैठणे, लक्ष्मी देऊबा पैठणे या वीर मातांचा 13 व्या महार बटालियनचे माजी सैनिक अनिल डोंगरदिवे, अजाबराव वाकोडे, गुलाब मिसाळ, रंजन सरकटे, विजय खरात, कौतिकराव पैठने मधुकर खरे, गणेश साळवे, विनोद डोंगरदिवे, विजय सुर्भे यांच्यावतीने बुलडाण्यातील सामाजिक न्यायभवन इमारतीच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी महार बटालियनच्या एकूण 22 बटालियन आहेत. या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक बनसोड, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी घेवंदे यांच्यासह शेकडो माजी सैनिक आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

13 व्या महार बटालियनच्या माजी सैनिकांकडून बटालियनचे घोषवाक्य देत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने युद्धात पराक्रम गाजवणार्‍या वीर जवानांनी युद्धातील काही आठवणींना उजाळा दिला.

Comments are closed.