Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू

शेगाव येथून भेट देऊन वाशिमला परत येत असलेल्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरातुन दर्शन घेऊन गुरुवारी मध्यरात्री घरी परतताना खामगावकडे जाणाऱ्या कारला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाल्याने कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह व गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवगरे, विशाल नवगरे, मंगेश नामदेव राऊत, पांगरीकुटे गावचे रहिवासी आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे.

हे देखील वाचा :

राज्यात ६१०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास मिळाला हिरवा कंदिल!, पवित्र (PAVITRA) प्रणालीच्या माध्यमातून होणार प्रक्रिया

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.