Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी भागात इन्फ्लुएंझा व न्यूमोनियाचे लसीकरण त्वरित सुरु करा – विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

  • आदिवासी भागात १८ ते ४४ वयोगटाच्या लसिकरणासाठी online रजिस्ट्रेशन ऐवजी on site रजिस्ट्रेशनची सुविधा द्या.
  • राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उसगाव दि. १३ जून : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत राज्यामध्ये ग्रामीण
आदिवासी भागात कोरोना महामारीचा उद्रेक झाला. सध्या हा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, पावसाळ्यात लहान मुलांमध्ये तापाची साथ पसरते आणि या तापाची लक्षणे कोरोनाप्रमाणे असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे मान्सून काळात रुग्णसंख्या व चाचण्यांची संख्या वाढू शकते व त्याचा आरोग्य व्यवस्थेवर अनावश्यक ताण येण्याची भीती व्यक्त करत विवेक पंडित यांनी आदिवासी भागात इन्फ्लुएंझा (Viral enfluenza) व न्यूमोनिया (Viral pneumonia) लसीकरणाबाबत त्वरित निर्णय घेऊन लसीकरण सुरु करण्याची मागणी मुख्यंत्र्यांकडे केली आहे. तसेच आदिवासी भागात १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींच्या लसिकरणासाठी online रजिस्ट्रेशन ऐवजी on site रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी श्री विवेक पंडित यांनी आपल्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भविष्यात येणाऱ्या कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेत प्रौढांसोबत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा ) यांनी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शहापूर या आदिवासी भागात पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा बाल विकास अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकार, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याशी संवाद साधला.

यावेळी झालेल्या बैठकीत आरोग्य सेवकांना प्रत्यक्ष आलेले अनुभव, तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीला कसे तोंड दिले याबाबतचे आपले अनुभव सांगितले तसेच सद्य परिस्थितीत कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत सूचनाही केल्या.

यावेळी झालेल्या चर्चेतून आदिवासी भागात इन्फ्लुएंझा (Viral enfluenza) व न्यूमोनिया (Viral pneumonia) लसीकरणाबाबत त्वरित निर्णय घेऊन लसीकरण सुरु करावे तसेच आदिवासी भागात १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींच्या लसिकरणासाठी online रजिस्ट्रेशन ऐवजी on site रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करावी जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असा निष्कर्ष निघाला.

त्यामुळे विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वरील प्रमाणे मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा पाहता राज्यातील आदिवासींसाठी केलेल्या मागण्या लवकरात मान्य होतील असा विश्वास विवेक पंडित यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा  :

वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू

आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

 

Comments are closed.