Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

विशेष प्रतिनिधी - के. सचिनकुमार

कोरोना भारतात आला तो काय धडाधड सगळं काही बंद होऊ लागलं. एखादया कलाकाराच्या आयुष्यात त्यांची कला म्हणजे जीव की प्राण? नृत्य, नाट्य, संगीत सगळं काही बंद. शाळाही बंद, मग कलाशिक्षकानी करायचं तरी काय?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या या कलाशिक्षकांसाठी तर ही घुसमट म्हणजे जणू एक मोठं आव्हान होत. मात्र जिल्ह्यातल्या १५० कलाशिक्षकांनी व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत ‘आर्टलाईनच्या’ माध्यमातून मंदावलेल्या, निराश झालेल्या ‘हार्टलाईनला’ जणू नवसंजीवनीच दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कोरोनाच्या काळात कोविड ड्युटी सांभाळत सुमारे ७०० चित्र या कलाशिक्षकांनी काढली. नुसती चित्रच काढली अस नाही तर माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत चित्र, शिल्प, रांगोळी, पोवाडे, गीतं या माध्यमातून सर्व कलाशिक्षकांनी कोरोनाबाबत जनजागृती देखील केली. कलेच्या या आनंदरंगात ऑनलाईन क्लासरूम किंवा प्रत्यक्ष वर्गात, एखाद्या आश्रमात अशा विविध ठिकाणी विद्यार्थी मित्रांना, कालाप्रेमींना देखील मार्गदर्शन करत उपक्रमात सहभागी करून घेतले.

प्रत्येक कलाकार हा त्याच्या कलेतून नेहमीच इतरांना फक्त आणि फक्त आनंदच वाटत असतो. आज सर्वत्र निराशेचे ढग दाटून आलेले असताना या कलेच्या सरींमधून अनेकांच्या मनाला नवीन पालवी फुटतेय. कोरोनाच्या या लढाईत हीच आर्टलाईन जगण्यासाठी, लढण्यासाठी बळ देतेय.

हे देखील वाचा :

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

 

Comments are closed.