Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रात्री प्रचंड राडा झाला. कोविड सदृश्य आजाराने एका पेशंटचा मृत्यू झाला होता.

याची माहिती तेथील इटर्न डॉक्टरांनी मृताच्या नातेवाईकांना दिली. यानंतर दोन तासांनी मृताचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तिथे जमा झाली. त्यातील पाच ते सहा जण हे दारू पिलेले होते. त्यांनी इंटर्न डॉक्टर सोबत बाचाबाची सुरू केली. आमच्या रुग्णास तुम्ही जाणून-बुजून मारले, असा आरोप करत तेथील डॉक्टरांना मारहाण केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही मारहाण सुरू असतांना डॉक्टरांनी ड्युटीवरील सुरक्षारक्षकांना आवाज दिला मात्र, त्यावेळी तिथे कोणीही हजर नव्हतं. आयसीयू वार्डामधून हा वाद थेट खालील गेट पर्यंत सुरु होता. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी डॉक्टरांना वाचवलं.

 

या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या तीन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित दहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखिल वाचा :

डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल तर अंबरनाथ मध्ये ५० रुपयात एक लिटर पेट्रोल! जाणून घ्या कसं?

‘अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण..,राऊतांचा मोठा खुलासा

 

Comments are closed.