Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रात हातात धनुष्यबाण धरला त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. ट्वीटद्वारे अँँड. आशिष शेलार यांचा कॉंग्रेसवर निशाणा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. १२ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बिहार निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं भाजपच्या नेत्याकडून कौतुक सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी लौकिकाला साजेशी ठरली नाही. याच मुद्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, काँग्रेसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला,  त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!

भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या “जगंलराज का युवराज” ला बिहारच्या जनतेने नाकरले. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत “जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज” युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.