Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात थंडीची लाट.

  • पुण्यात ९.८ सर्अंश सेल्सिअस वाधिक कमी तापमानाची नोंद.
  • नागपूर येथे १८.३ अंश सेल्सिअस.
  • चंद्रपूरमध्ये ११.२ अंश सेल्सिअस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : महाराष्ट्रराज्यात दोन दिवसांपासून थंडीला चांगलीच सुरुवात झाली आहे. पहाटे पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. गेले दोन दिवस तापमानात घट होताना दिसून येत आहे. आज दुसऱ्या दिवशी तापमानात लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक, जळगावात तापमान सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या आसपास राहिले आहे. त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी हवेत गारवा जाणवत असून झोंबणारा गारवा जाणवत आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमान मोठी घट झाली असून पुण्यात ९.८ तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये १०.४ तर जळगावात १०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरातही तापमानात घट झाली आहे. सांताक्रुझ येथे १९.८ अंश सेल्सिअस, डहाणू १८.८ अंश, बारामती ११.९ अंश, औरंगाबाद १२.८, परभणी १३ अंश सेल्सिअ, चंद्रपूरमध्ये ११.२ अंश तर यवतमाळ येथे ११.५ आणि नागपूर येथे १८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.परभणीचा पारा सलग आठ दिवस घसरून ८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे.धुळे आण नंदुरबार जिल्ह्यात १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.