Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजविक्री स्टॉलचे उदघाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर दि,११ :‘मेरी माटी-मेरा देश’ (माझी माती, माझा देश) उपक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर स्वंयसहायता समूहाच्या ध्वज विक्री स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडे उपस्थित होते.

देशभरातील विरांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ पंतप्रधान यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत देशातील विरांचा सन्मान वाढावा तसेच राष्ट्रभक्ती वाढावी, याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहायता समुहाने ध्वज विक्री स्टॉल सुरू केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या स्टॉलचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी उमेद अभियानातील जिल्हा व्यवस्थापक तसेच तालुका व्यवस्थापक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पंचायत समिती स्तरावरही याच स्वरुपाचे स्टॉल सुरू करण्यात येणार आहे, असल्याचे श्री. कलोडे यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बुद्धविहार जीर्णोद्धाराच्या बांधकामासाठी माजी आ.दिपकदादा आत्राम यांची आर्थिक मदत

जमिन, शिक्षण व व्यवसाय आदिवासींच्या विकासाची त्रिसूत्री- अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे मत

विदर्भाचे सुपुत्र सेन्साई रवि भांदककार यांना जागतिक कराटे मास्टर्सच्या दुहेरी सुवर्ण पदक करीता निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.