Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विदर्भाचे सुपुत्र सेन्साई रवि भांदककार यांना जागतिक कराटे मास्टर्सच्या दुहेरी सुवर्ण पदक करीता निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 9 ऑगस्ट 2023 : नगरपंचायत अहेरीचे ब्रँन्ड अँम्बेसिडर ( स्वच्छता दुत) तथा मास्टर्स कराटे जागतीक सुवर्ण पदक- 22 थायलंड बँकाॅक विजेते सेन्साई रवि भांदककार यांची 16 ते 23 सप्टेबंर 2023 पर्यतं थायलंडची राजधानी बँकाॅक येथे होणार्‍या तिसर्‍या जागतीक मास्टर्स कराटे स्पर्धा तथा जागतीक मास्टर्स क्रीडा पुरस्कार करीता दुसर्‍यादां निवड झाली असुन त्याना रॉयल रत्नकोषिनच्या भव्य सभागृहात देशाकरीता दुसर्‍यादां सुवर्ण पदक प्राप्त करण्याची संधी आहे.

सदरची निवड वर्ल्ड मार्शल आर्स्टिस्ट काँन्सील यु.के.,वर्ल्ड मिठ थायलंड बँकाॅक,वर्ल्ड मार्शल आर्ट जपान,वर्ल्ड बायग्राकाॅन मार्शल आर्ट स्कुल थायलंड, पि.न.को वर्ल्ड यु.के, A1 ग्लोबल मिडीया अमेरीका यांच्यां सयुक्त विद्यमाने झाली असुन सदर जागतीक क्रीडा पुरस्कार व जागतीक मास्टर्स कराटे स्पर्धेत 25 पेक्षा अधिक देशाचे स्पर्धक व पुरस्कर्ते ऊपस्थीत राहणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यातील स्पर्धेत अवॉर्ड कार्यक्रमात यु.एस.ए,अमेरीका,ईडोनेशिया,कोरीया,जपान,साऊथ आफ्रिका,लंडन यु.के,नेपाल,फिलीपिन्स,सिगांपुर,मलेशिया,श्रीलंका,पाकीस्तान,थायलंड,झिम्बांबे,बांग्लादेश,ब्रम्हदेश,म्यानमार,कॅनडा, नायझेरीया आदी देशातील स्पर्धक व पुरस्कर्त्याची ऊपस्थीती राहणार आहे. या स्पर्धेचे आयोजक मा.टोनी टायलर ग्रँन्डमास्टर तथा बाॅलीवृड स्टार अमेरीका यु.एस.ए, एच.ई.डाॅ.ज्युरापस प्रितीकेश्तरन मिस थायलंड, मान.शिंदो जून ग्रँन्डमास्टर जपान व भारताचे डायरेक्टर तथा ग्रँन्डमास्टर प्रो.एम.ए.अली कोलकत्ता यांच्या मान्यतेने झाली असुन पहिल्यादांच एव्हढ्या मोठ्या स्तरावर आयोजन होत असलेल्या मास्टर्स क्रीडा पुरस्कार व जागतीक मास्टर्स कराटे स्पर्धेत भारतातुन विदर्भाचा सेन्साई रविच्या माध्यमातुन डंका वाजणारआहे.

तत्पुर्वी सेन्साई रवि भांदककार यानां राष्ट्रीय हाॅल आँफ फेम अवार्ड -22 कलकत्ता प.बंगाल,राष्ट्रीय ग्रँन्डमास्टर पुरस्कार -22 अहमदाबाद गुजरात व जागतीक क्रीडा मास्टर्स पुरस्कार -22 थायलंड बँकाॅक हे प्राप्त झाले आहे. ते ऊत्तम आतंरराष्ट्रीय प्रशिक्षक पण आहेत. सदरहु जागतीक स्पर्धे करीता भारतीय कराटे संघ नेताजी सुभाषचंद्र बोस आतंरराष्ट्रीय विमानतळ डम डम कोलकत्ता वरुन दिनांक 16 सप्टेबंर 2023 ला थायलंड राजधानी बँकाॅक करीता रवाना होणार.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सेन्साई रवि भांदककार हे 15 सप्टेबंर 2023 ला डाॅ.बाबा साहेब आंम्बेडकर आतंरराष्ट्रीय विमानतळ नागपुर येथुन कोलकत्ता करीता रवाना होतील.सेन्साई रवि भांदककार हे वयाच्या 10 व्या वर्षापासुनच मार्शल आर्ट कराटेचे धडे गिरवित असुन मार्शल आर्टचे प्रशिक्षणही देत आहेत. त्याचां प्रथम विदर्भ सुपुत्र ते मास्टर्स कराटे जगजेता-22 थायलंड व नगरपंचायत अहेरीचे ब्राँन्ड अँम्बेसीटर ( स्वच्छता दुत ) पर्यतंचा कठीण प्रवास पल्ला गाठला . त्यांनी अश्याच प्रकारे पुन्हा दैदिप्यमान यश संपादन करावे. जागतीक स्तरावर देशाचे नाव लौकीक करावे असे विदर्भ वासीयांनकडुन शुभेच्छा प्रदान करण्यात येत आहे.

त्याच्यां यशामुळे क्रीडाक्षेत्रातील खेळाडुंनमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण निर्मित झाले आहे. ते अनेक खेळाडुचें आदर्श देखील झाले आहेत. ही अतिशय गर्वाची बाब आहे. सर्व खेलप्रेमी कडुन त्यानां शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Comments are closed.