Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंढरपूर च्या अभिजीत पाटील यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पंढरपूर  25 ऑगस्ट :-  पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या आॅफीस, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात इन्कमटॅक्स विभागाची तपासणी सुरू. त्याच बरोबर इतर साखर कारखान्यामध्ये ही तपासणी सुरू असल्याची माहिती.

साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऊस वाहूतक ठेकेदार ते साखर सम्राट असा प्रवास अल्पावधीत करणारे डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या निवासस्थानी आणि पंढरपूर मधील कार्यालयात आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे. पुणे रोडवरील त्यांच्या कार्यालयात तपासणी सुरू आहे.

उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली आहे आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केल्याची माहिती आहे. पंढरपूर येथील अभिजीत पाटील हे या कारखान्याच्या चेअरमन असून त्यांच्या इतर मालमत्तांवर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील यांची ओळख साखर सम्राट निर्माण झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्याने पाटील प्रकाशझोतात आले होते. तसेच त्यांच्या ताब्यात एकूण ५ कारखाने आहेत.

हे देखील वाचा :- 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.