Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय महामार्ग,पंतप्रधान ग्राम सडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या आणि सुरु असलेल्या रस्ते,पुल व अन्य बांधकामाची पाहणी करुन बोगस कामांची चौकशी करावी.भारतीय जनसंसद गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि ,२६ मार्च :- गडचिरोली जिल्हा हा  अविकसीत व मागासलेला असुन या जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासा करीता राज्य सरकार व केन्द्र शासन दरबारी विविध विकासात्मक योजना राबवून लाखो करोडो रुपयाने रस्ते,पुलीया,बिल्डींग व अन्य कामे कंञाटदाराच्या माध्यमातून करीत असतात.परंतू अनेक बांधकामावर कंञाटदार व अभियंता यांचे संगणमताने अंदाज पञक डावलून अत्यंत निक्रूष्ट दर्जाचे व बोगस कामे केल्याचे निदर्शनास येत आहेत.

दुर्गम भागातील होणारे कामे कंञाटदार व अभियंत्याच्या कमाईचे साधन झालेले आहेत.तेव्हा गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील साध्याभोळ्या जनतेचा फायदा घेऊन कंञाटदार व अभियंत्यानी जनतेचा विश्वासघात करुन एक प्रकारे शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा काम सुरु केलेला आहे.यात कंञाटदार,अभियंता व वरीष्ट अधिकारी हे साखळी पध्दतीचा भ्रष्टाचार करुन नियमबाह्य व बोगस कामे करतात .अनेक कामावरील वापरण्यात येणारी साहीत्य निक्रूष्ट असतात.अनेक रस्त्याच्या झालेल्या कामावर थिकनेस राहत नाही.अनेक डांबरींग रस्ते तयार करताना खालच्या दर्जाचे डांबर वापरल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्या मुळे अल्पावधीत रस्ते उखडने, गिट्टी बोल्डर बाहेर येणे,रस्त्यावर खड्डे पडने,डांबर न दिसणे अशा वेळेस वाहनधारकाना व दळण,वळण करणा-या नागरीकांना अडथळा निर्णाण झालेला असतो व यात प्रंचड ञास सहन करावा लागतो. तेव्हा कामकाजात पारदर्शता टिकून राहील व या पुढे नियमबाह्य कामे होऊ नये म्हणून गडचिरोली जिल्ह्यात गेले तीन वर्षात राष्ट्रीय महामार्ग,पंतप्रधान ग्राम सडक योजना,व सार्वजनिक बांधकाम विभागाने कंञाटदारा मार्फत केलेली व सुरु असलेल्या रस्ते,पुलीया,डांबरीग,बिंल्डीग व कामांची काय दशा व दुर्दशा झालेली आहेत.कामावरील कालावधीत देखभाल दुरुस्ती केल्या जातात किवा नाही या करीता गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्ग,पंतप्रधान ग्रामसडक,व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक कामांची मोका पाहणी करुन अंदाजपञक डावलून करण्यात आलेली नियमबाह्य निक्रूष्ट बोगस कामे आढळल्यास वेळीच सदर कामाचे उच्च स्तरीय चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी संबधाने त्या त्या विभागाचे वरीष्ट अधिकारी व शासन,प्रशासनास तक्रार निवेदन सादर करुन चौकशी करीता भाग पाडणार.व दोषी आढणा-या कंञाटदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करुन बोगस कामे करवून घेणा-या संबधीत अभियंत्यावर कायदेशीर शास्तीच्या कार्यवाहीस भाग पाडणार चौकशी करीता वेळकाढूपणा किंवा कामचूकार झाल्यास वेऴ प्रसंगी लोकशाहीच्या मार्गाने तिव्र आंदोलने केल्या जातील असे आवाहन भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केले आहे .

Comments are closed.