Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दीपाली चव्हाण (RFO)आत्महत्या प्रकरण-विनोद शिवकुमार DFO यांना फाशी द्या आई शांताबाई चव्हाण यांची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

” जो पर्यन्त अटक होत नाही तो पर्यन्त बॉडी ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबीयांची मागणी “

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमरावती दि २६ मार्च :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून काल सायंकाळी साडे सात वाजता आत्महत्या केली,दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने ४ पाणाची सुसाईड नोट लिहिली यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी व कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात,रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांची मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे.यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्या कडे तक्रार केली मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेख या सुसाईड नोट मध्ये आहे. माझ्या मुलीला खूप दिवसापासून अधिकाऱ्यांचा त्रास होता, माझ्या घरी dfo सचिन शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होते व दीपालीला शिवीगाळ करत होते, त्यामुळे त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या अशी मागणी मृत दिपाली चव्हाण यांचे आई शकुंतला चव्हाण यांनी केली आहे.
तर राजेश मोहिते (पती) यांनी हि माझ्या  पत्नीने वारंवार वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या होत्या सोबतच या प्रकारचे पत्रव्यवहारही केले होते मात्र त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. माझ्या पत्नीला शिव कुमारी अधिकारी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत होते त्यामुळे ती त्रस्त झाली होती त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले अशी प्रतिक्रिया दिपाली चे पती राजेश मोहिते यांनी दिली आहे .जो पर्यंत आरोपीला फासी  होत नाही व व आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही दीपालीची डेड बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांकडून घेतली आहे


टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.