Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरी तहसिलदार कडून रेती/वाळू निर्गेमाबाबत सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि.२५: आरमोरी तालुक्यातील सर्व जनतेला सूचित करण्यांत येते की, आरमोरी तालुक्यातील मंजूर घरकूल लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी, आरमोरी यांचेकडून प्राप्त झाल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना ०५ ब्रास मोफत वाळूचे वितरण करणेकरीता संबंधित तलाठी यांना वाहतूक पास पुरविण्यांत येवून ६५०० ब्रास रेतीचे एकूण १६३० लाभार्थ्यांना ०५ ब्रास मोफत रेती / वाळूचे वितरण करण्यांत आले आहे. माहे जुन ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी असून सदर कालावधीत पाऊस सुरु झाल्यानंतर रेती / वाळूचे वितरण करता येणार नाही. परंतू तद्नंतर माहे ऑक्टोंबर मध्ये रेती / वाळूचे वितरण करता येईल. दरम्यानचे कालावधी रेती/ वाळूची अत्यंत आवश्यकता भासल्यास आरमोरी तालुक्यात मौजा देऊळगांव येथे रेती / वाळू डेपोची निर्मीती करण्यात आली असून सदर वाळू डेपोमध्ये १०% वाळू ही प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल लाभार्थी यांचेकरीता राखीव ठेवण्यांत आली आहे. माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत रेती / वाळू‌ची आवश्यकता भासल्यास लाभार्थी यांनी संतु केंद्रामधुन आधारकार्डचे सहाय्याने नोंदणी करुन वाळूची बुकींग केल्यानंतर वाळू डेपोमधुन घरकुल लाभार्थ्यांना रेतीची उचल करता येईल. परंतु घरकुल लाभार्थ्यांपैकी ज्या लाभाथ्यांनी तलाठी यांचेमार्फतीने मोफत ०५ ब्रास वाळूची उचल केली आहे. त्यांना मोफत वाळूची उचल करता येणार नाही. त्याचप्रमाणे घरकूल लाभार्थी व्यतीरिक्त इतर घरबांधकाम देखील आरमोरी तालुक्यात सुरु असून त्यांनाही रेती / वाळूची गरज भासल्यास मौजा देऊळगांव येथील वाळू डेपोमधून रेतीची बुकींग करुन उचल करता येईल, तसेच आरमोरी तालुक्यात मौजा- डोंगरसावंगी येथे शेतातील वाळू निष्कासनाची परवानगी प्रदान करण्यांत आली असून त्याची मुदत दिनांक ०७ जुलै २०२५ पर्यंत असून तिथुन सुध्दा रेतीची खरेदी करता येईल, सद्यास्थितीत देऊळगांव येथील वाळू डेपो सुरु आहे. तसेच डोंगरसावंगी येथेही वाळू विक्री सुरु आहे.

तरी आरमोरी तालुक्यातील जनतेला अवाहन करण्यांत येते की, पावसाळ्याचे कालावधीत रेती / वाळूची गरज भासल्यास वर नमुद केल्याप्रमाणे ठिकाणाहून रेती /वाळूची उचल करता येईल. कोणत्याही प्रकारे चुकीच्या मार्गाने वाहू खरेदी करु नये. असे तहसिलदार आरमोरी यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.