Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २२ एप्रिल: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

सोलापूरच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ संस्कृत विद्वान, अध्यापक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. दिवंगत पंडित बिराजदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.