Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलीप वळसे-पाटील करोना पॉझिटिव्ह.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई :- कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही करोनाने गाठले आहे. वळसे-पाटील यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दैनंदिन कामकाजासाठी आज सकाळीच ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतल्याचे समजते. तसंच, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाच्या सोहळ्याला वळसे-पाटील उपस्थित राहिले होते. त्यामुळं चिंता वाढली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वळसे-पाटील यांनी स्वत: ट्वीट करून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. ‘नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून करोनाची चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ‘आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दिलीप वळसे-पाटील हे आज सकाळी मंत्रालयात उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधीच करोना चाचणीचा अहवाल आल्याने ते घरी निघून गेले. त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. वळसे-पाटील हे मागील आठवड्यात झालेल्या खडसे यांच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. तिथं ते अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळं अन्य नेत्यांनाही त्या दृष्टीनं काळजी घ्यावी लागणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.