Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी बांधवांच्या हक्क,कोणालाही हीरावता येणार नाही न्याय, हक्कासाठी पाठपुरावा करणार- खा. अशोक नेते यांची प्रतिक्रिया…

21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी संघटनांचे धरणे आंदोलन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली :- दि. 29 ऑक्टो
राज्यातील गैरआदिवासी युवकांनी आदिवासी असल्याचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून नौकरी मिळवली असून ते आजही नौकरी वर कायम सेवेत आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार बोगस जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकविनार्यागैर आदिवासींना सेवेतून कमी करण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाने परिपत्रक काढले मात्र राज्य शासनाकडून अदयाप सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात नसल्याने खऱ्या आदिवासी युवकांना नौकर भरती पासून वंचित राहावे लागत आहे. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी यासह अन्य मागण्या साठी नागपूर येथे आर्गनायझेशन फॉर राईड्स ऑफ ट्रायबल व अन्य आदिवासी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून नवीन शासन निर्णयानुसार पदभरती घेण्याबाबत तसेच अन्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून खऱ्या आदिवासींना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी खासदार अशोक नेते यांनी आदिवासी संघटनांना दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभेचे आम.डॉ. देवरावजी होळी, आदिवासी संघटनेचे श्यामजी धुर्वे, भाजपा सोशल मीडियाचे अक्षय उईके, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे, व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत विचारणा केली असता आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी यांनी सांगितले की, 1 ) 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे आदिवासींच्या 12500 पदांची सरकारी नोकर भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, 2) गैर आदिवासीना अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून 11 महिन्यासाठी दिलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्या. 3) जगदीश बहिरा समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. यासह इतर महत्वाच्या व प्रलंबित मागण्यासाठी हे उपोषण, आंदोलन सुरू असून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे व संघटनेच्या पदाधिकारी यांनी खासदार अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

या मागण्याची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी सदर प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना पदभर्तीची ही स्थिती आपण समजावून सांगणार असून आदिवासी समाजाच्या प्रश्न, समस्या सुटेपर्यंत आपण राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असून या समस्या सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी आम.डॉ देवरावजी होळी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करून मागण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Comments are closed.