Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाण्यात शिवसेनेची गळती सुरूच .

विभागप्रमुखसह शिवसैनिक शिंदे गटात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

उल्हासनगर, 07, सप्टेंबर :- लालचक्की चौकात मंगळवारी माँ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिंदे गटातील पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शिवसेना विभाग प्रमुख राजू माने यांच्यासह इतरांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे पत्रकारांना सांगितल्यावरून शिवसेना व शिंदे गट आमने-सामने येऊन आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

उल्हासनगर महापालिकेवर भाजप सोबत सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना शिंदे गटाने यापूर्वीच केला. मंगळवारी माँ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त कॅम्प नं-४ लालचक्की चौकात अभिवादन ठेवण्यात आले. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, विभागप्रमुख राजू माने, शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक अभिवादानासाठी एकत्र आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच शिवसेने प्रमाणे शिंदे गटाचे गोपाळ लांडगे, नाना बागुल, अरुण अशान, राजेंद्र सिंग भुल्लर यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक एकत्र येऊन अभिवादन केले. यावेळी राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख राजू माने, राजू शिंदे व विनोद हिंगे यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला गळती लागली असतांना, शहरात शिवसेना मजबूत स्थितीत आहे. शिवसेनेचे काही कट्टर माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. इतर जण उपरे व अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. जुने जाणते नेते व पदाधिकारी शिवसेने सोबत असून पक्षाला आदीचे वैभव प्राप्त करून देणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

तुर पिकावरील ‘मारुका’ अळीचे व्यवस्थापन.

खळबळजनक : नागपूर जेल मधून गांजा तस्करी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.