Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खळबळजनक : नागपूर जेल मधून गांजा तस्करी

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 06 सप्टेंबर :-  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर  मध्यवर्ती कारांगृहातून गांजा तस्करी पकडली गेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक निलंबित पोलीस निरीक्षक सुद्धा सहभागी असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणात मोक्का प्रकरणातील आरोपी सूरज कन्हय्यालाल कावळे (वय २२, रा. खापरखेडा) याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता कारागृहातील बंदीवान व निलंबित उपनिरीक्षकही पोलिसांच्या रडारवर आला आहे. अटकेतील आरोपींमध्ये सूरजचा भाऊ शुभम कावळे, त्याचा मित्र सूरज वाघमारे, अमली पदार्थ तस्कर मोरेश्वर सोनवणे, मुकेशबाबू पंजाबराव नायडू, भागीरथ थारदयाल व कुख्यात शेखू टोळीचा सदस्य अर्थव खटाखटी यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार व सूरज एकाच बराकीत राहतात. त्यामुळे दोघांची ओळख आहे. प्रदीपकुमारने सूरजच्या मदतीने कारागृहात मोबाइल, बॅटऱ्या व गांजा आणायला सुरुवात केली. सुरुवातीला विविध माध्यमांतून काही मोबाइल कारागृहात पोहोचविण्यात आले. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या नव्हत्या. प्रदीपकुमार याने कारागृहातूनच मोबाइलद्वारे एका मित्राशी संपर्क साधून शुभम याला ४५ हजार रुपये द्यायला लावले.

दरम्यान सोमवारी न्यायालय परिसरात शुभम व भागीरथ या दोघांनी आरोपपत्र असलेल्या फाइलमध्ये ५१ ग्राम गांजा व १५ मोबाइलच्या बॅटऱ्या ठेऊन त्या सूरजला दिल्या. कारागृहात जाण्यासाठी तपासणीदरम्यान सुरक्षा रक्षकांना फाइलमध्ये गांजा व मोबाइलच्या बॅटऱ्या आढळल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धंतोली पोलिस स्टेशन गाठले. तब्बल चार तास पोलिस आयुक्त धंतोली पोलिस स्टेशनमध्ये तळ ठोकून होते. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी कट रचणे, अमली पदार्थ बागळण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी प्रोडक्शन वॉरंट घेऊन सूरजला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची शनिवार, १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. त्यानंतर अन्य सहा जणांनाही अटक करण्यात आली.

याप्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आल्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तडकाफडकी आरोपी सेलच्या हेड कॉन्स्टेबल प्रकाश मुसळे, आणि शिपाई हेमराज राऊत या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.या सेलमधील एक अधिकारीही या प्रकरणाने चर्चेत आला आहे. सखोल तपास करण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिस व अमली पदार्थ विरो सोपविण्यात आला आहे.

हे देखील वाचा :-

शिवसेना कुणाची याचा निकाल 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत होणार….

Comments are closed.