Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाही होण्याची अपेक्षा होती आम्ही थोडा लेट झालो- वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर, दि. ९ एप्रिल :  सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाही होण्याची अपेक्षा होती आम्ही थोडा लेट झालो असे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले सदावर्ते यांची भाषा कामगारांना भडकवणारी होती.  कालची जी घटना घडली ती अत्यन्त निंदनीय आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

आंदोलन असे नसावे, असेही ते म्हणाले.  न केलेली कामाचे श्रेय सदावर्ते घेतो, लोकांचे हाल झाले त्यांचं देणं घेणं न ठेवता कामगारांना अडचणीत आणत होता, याबाबत कारवाईची गरज आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. या हल्ल्याचे मागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल असेही वडेट्टीवार म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूर कनेक्शन असे बोलणे उचित होणार नाही, हा तपासाचा भाग आहे जे काही आहे ते समोर येईल. पोलिसांची गफलत नक्की झाली पोलीस चुकले आहे. आवश्यक चौकशी होण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.
कोरोना मुक्त होऊन फिरत आहे, साऊथ आफ्रिकेतून आलेला रुग्ण बरा झाला, लोकांना आव्हान करतो मास्क घालून काळजी घ्यावी, नवीन व्हेरियांत पासून स्वतःला वाचवावे.

Comments are closed.