Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकस्पर्श न्यूजचा व्दितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अल्पावधीतच लाखो वाचकांच्या हृदयात ठसा उमटविला आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्कला खडतर प्रवास करीत दोन वर्ष पूर्ण झाले असून लोकस्पर्श न्यूज नेटवर्कच्या दुसरा वर्धापन दिन मोठ्या हर्ष उल्हासात गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पार पडला.

गडचिरोली,  26, ऑक्टोबर :-  गडचिरोली जिल्हयात लाखो वाचकांच्या हृदयात स्थान प्राप्त करणाऱ्या  लोकस्पर्श न्यूजचा दुसरा वर्धापन दिन  मंगळवारी २५ ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश गेडाम दलित पुरस्कृत, उपविभागीय वनाधिकारी सोनल भडके, सदाशिव मंडावार, प्रभाकर मंडावार, राठोड सर यांच्यासह आभासी पध्दतीने लोकस्पर्श न्यूजचे कार्यकारी संपादक मनोज सातवी सर, प्रतिनिधी धुरी सर, एंकर स्वाती केदारे यांची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकस्पर्श न्यूजने वाचकांच्या विश्वासाची दोन वर्ष पूर्ण केली आहे. या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील वाचकांचा मोठा वाटा आहे. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे हि यशपूर्ती पूर्ण झाली आहे. म्हणून मंगळवार दि. २५ ऑक्टोंबर  रोजी आय.टी.आय. चौक नजीक असलेल्या लोकस्पर्श न्यूजच्या कार्यालयात सायंकाळी ७.०० वाजता खा. अशोक नेते यांच्याहस्ते लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना खा. अशोक नेते म्हणाले की, नक्षलग्रस्त भागातील लोकस्पर्श न्यूजने जिल्हाभरात नाव लौकीक करून विश्वास संपादन केले आहे. त्यामूळेच लोकस्पर्श न्यूज यशस्वी होत उतरोत्तर प्रगती व्हावी अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.

याप्रसंगी लोकस्पर्श न्युजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचे हस्ते केक कापण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक ओमप्रकाश चूनारकर यांनी लोकस्पर्श न्यूजच्या दोन वर्षाच्या वाटचालीवर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, लोकस्पर्श नेटवर्कने चालू घडामोडी तसेच महत्वाच्या बातम्या देत लोकांच्या मनात एक ठसा उमटविला आहे. लाखो वाचकांच्या पसंतीला उतरलेल्या लोकस्पर्श न्यूज चैनल, यूट्यूब ला  २५ ऑक्टोंबर २०२२ ला दोन वर्ष पूर्ण झाले. यापेक्षा महत्वाचे म्हणजे आपल्या लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ला स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ समजून वाचकांनी हवे असणारे बदल सांगितले. वाचकांनी दिलेल्या विविध प्रतिक्रिया आणि बदलाचा लोकस्पर्शच्या टीम ने विचार करत बातम्यांमध्ये नवनवीन मांडणी करत ताज्या घडामोडीसह विविध विषयांवर महत्वाच्या बातम्या टाकण्यावर अधिक जोर दिला. त्यामुळे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अजून मजबूत होण्यास वाचकांच्या सल्ल्यांचा मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे लोकस्पर्श न्यूज, चैनल, वेब सह यूट्यूब ची लोकप्रियता वाढली असून एखादी दिवस बातम्या येण्यास उशीर झाल्यास नागरिकांच्या प्रतिक्रिया येत असल्यामुळे लोकस्पर्श न्यूज टीम ला अधिक उत्साह काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक रवी मंडावर यांनी केले तर आभार उपसंपादक रुपाली शेरके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकस्पर्श न्युजचे विशेष प्रतिनिधी सचिन कांबळे आणि भूषण बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : 

धोनीच्या प्राॅडक्शन हाउसचा पहिला सिनेमा तामिळ भाषेत

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का !

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.