Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धोनीच्या प्राॅडक्शन हाउसचा पहिला सिनेमा तामिळ भाषेत

पत्नी साक्षी साकारणार खास रोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 26, ऑक्टोबर :-  टीम डंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ने आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगची तयारी सुरू केली आहे. आपल्या धोनी एंटरटेन्मेंट या प्राॅडक्शन हाउसच्या बॅनरखाली तो लवकरच चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार आहे. त्याची सुरूवात एका तामिळ चित्रपटाने होणार आहे. अथर्व-द ओरिजिन चे लेखक रमेश थमिलमणी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. धोनीच्या प्राॅडक्शन हाउस ने हेही जाहीर केलय की ते देशभरातील अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करणार आहेत. तामिळशिवाय धोनीचे प्रोडक्शन हाउस सस्पेन्स थ्रिलर, क्राईम, विज्ञान कथा आणि इतर अनेक विषयांचे चित्रपट आणणार आहे. त्यासाठी अनेक चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखकांशी सध्या चर्चा सुरू आहे.

साक्षी धोनीची संकल्पना

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धोनीचे प्राॅडक्शन हाउस जो तामिळ चित्रपट बनवणार आहे. त्याची संकल्पना साक्षी धोनीची आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असेल. चित्रपटात काम करणार्या कलाकारांची नावे नंतर जाहीर केली जाणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारलेल्या थमिलमणी यांनी सांगितले की, या चित्रपटाबाबतची साक्षीची संकल्पना मी वाचली आहे. हे खरोखर विशेष आहे. ही एक पूर्णपणे नवीन संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर संपूर्ण फॅमिली ड्राम फिल्म बनण्याची पूर्ण क्षमता आहे.

तामिळनाडूशी धोनीच अनोख नात

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धोनीच्या प्राॅडक्शन हाउसने नुकतेच एक निवेदन जारी केले आहे. प्राॅडक्शन हाउसने जारी केलेल्या या निवेदानात म्हटले आहे की, धोनीच तामिळनाडूच्या लोकांशी एक खास नात आहे. अशा परिस्थितीत तामिळ भाषेत त्यांचा पहिला चित्रपट बनवून त्याला हे खास नात आणखी घट्ट करायचे आहे.

तुम्हाला माहितच असेल की चेन्नई सुपर किंग्स या टीमचा धोनी कॅप्टन आहे. यत्याने चेन्नईला आतापर्यंत 4 वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे. त्यामुळे तामिळभाषिक आणि तामिळनाडूबद्दल त्याच विशेष प्रेम आहे.

हे देखील वाचा :-

Comments are closed.