Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री शिंदे घेणार अयोध्येत रामलल्लाचं दर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई, 26, ऑक्टोबर :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असं सांगणारे एकनाश शिंदे दिवाळीनंतर अयोध्येचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात अयोध्येला जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. अयोध्येत ते रामलल्लाचं दर्शन घेतील. शिंदे यांचा अयोध्या दौरा हे शक्तिप्रदर्शनच ठरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांसह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत. दिवाळीनंतर मंत्रिमंडळचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे मंत्री अयोध्येत जाऊन शक्तीप्रदर्शन करणार अशी सूत्रांची माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. गर्भगृह आणि पहिला मजला डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराला सागवान लाकडी दरवाजे असतील. मंदिरावर भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही. दगड तांब्याच्या पानांनी जोडण्याचं काम सुरू आहे. आत ५ मंदिरं बांधली जातील. मंदिराच्या भिंती, पंचदेव मंदिर बांधण्यात येणार आहे. तसंच सूर्यदेव मंदिर आणि विष्णू देवता मंदिर बांधण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर समोरच्या प्रवेशद्वारावर सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप आणि गूढ मंडप बांधण्यात येणार आहे. त्यासमोर मंडप बांधण्यात येईल, असं मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी पायाभरणी केल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला वेगाने सुरुवात झाली. अयोध्या भेटीदरम्यान २३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राची पाहणी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.