Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय चलनांमध्ये गांधी सोबत गणपती आणि लक्ष्मीचा हवा फोटो

केजरीवाल यांची अजब मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 26, ऑक्टोबर :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. भारतीय चलनांमध्ये येणार्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबतच गणपती आणि लक्ष्मीचा ही फोटो असावा अशा आशयाची मागणी केली आहे. देशाच्या आर्थिक समृध्दीसाठी देवदेवतांचा आशीर्वादही महत्वाचा आहे, असे कारण त्यांनी दिले आहे.

इंडोनेशियतल्या नोटांवर गणपतीचा फोटो

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इंडोनेशियाचे उदाहरण देत केजरीवाल म्हणाले, तिथे 85 टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मीय असून ही त्यांच्या चलनावर गणपतीचे चित्र आहे. जर ते अस करू शकतात, तर आपण का नाही?

एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना केजरीवाल म्हणाले, दिवाळीच्या निमित्त्याने लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतेवेळी अचानकच माझ्या मनात विचार आला की, चलनांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा. मी असं म्हणतच नाहीये, की यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल. पण, यामुळे देवाचा आशीर्वाद तरी मिळेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गांधीजी सोबत हवेत देवदेवतांचे फोटो

आम्ही कोणाचेही फोटो हटवण्याची मागणी करत नसून, एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसर्या बाजला लक्ष्मी-गणपतीचा फोटो असावा असे त्यांचे म्हणणे आहे. या मुद्यांवरून केंद्र सरकारला आपण रितसर पत्र लिहणार असल्याचे ही केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, सध्या केजरीवाल दिल्ली नगर निगम निवडणूकांसाठी सज्ज होतांना दिसत आहेत. सध्या भाजपाचे आव्हाण धूळीस मिळवण्यासाठी ते आशावादी असून, आता त्यांना यश मिळते का हे पाहणे महत्वाचे असेल.

हे देखील वाचा :-

Comments are closed.