Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू होणार – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 29 जून : गरजूंना न्याय देणे महत्वाचे असून त्यानुसार कोरोना प्रादुर्भावामुळे बंदअसलेल्या मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीलासामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सोमनाथ बागुल, मंत्रालय सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मधुकर जवळकर, मंत्रालय सार्वजनिकबांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक गायकवाड, गृह विभागाचे कक्ष अधिकारी बाबासाहेब खंदारे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच ‘टेक अवे’या तत्वावर उपहारगृह सुरू करण्याच्या सूचना दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिल्या. या निर्णयामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची अल्पोपहाराची सोय होण्यास मदत होणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात टाळेबंदी लागु करण्यात आल्याने  अनेकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची परिस्थिती ओढावली होती. त्यामध्ये उपहारगृहातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.या निर्णयामुळे उपहारगृहात काम करणाऱ्या महिलांचारोजगार पुन्हा सुरू होईल, अशी भावना उपहारगृह चालकांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरातील प्रस्तावित ॲम्फी थिएटरसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.