Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरातील प्रस्तावित ॲम्फी थिएटरसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 29 जून : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरात  उभारण्यात येणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी आमदार हरिभाऊ राठोड, नागपूर महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी श्री.ठाकरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, एनएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता लिला उपाध्ये, अवर सचिव सं.कृ.भोसले उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात येणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. यापुढे अधिक विलंब उशीर न करता तातडीने जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे सभागृह उभारण्याचे प्रस्तावित होते. सन 2012-13 पासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मार्गी लावावा. अशी जनभावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर जागा मिळवून देवून प्रकल्पाचे भूमिपूजन करावे, अशी मागणी याविषयी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी आमदार हरिभाऊ राठोड आणि एकनाथ पवार यांनी यावेळी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा

शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट

 

Comments are closed.