शहीद जवान भूषण सतई यांच्या पार्थिवावर उद्या लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
काटोल, दि. १५ नोव्हें.: काटोल शहरातील जवान जम्मू काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टर मध्ये भारतीय सेनेत कार्यरत नायक भुषण रमेश सतई हे पाकिस्तान कडुन झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले त्यांचे पार्थिव उद्या 16नोव्हेंबर ला सकाळी ८ वाजता काटोल येथील निवासस्थान येणार असून त्यानंतर सकाळी १० वाजता शहिद भुषण यांचे श्रीकृष्ण नगर फैलपुरा निवासस्थानाहुन अंत्ययात्रा निघणार असुन नगरभव, जैन मंदिर चौक, स्टेट बँक चौक – रुईया हायस्कूल चौक – गर्ल्स होस्टेल – गुरांचा दवाखाना – गळपुरा – दोडकीपुरा – आंबेडकर चौक – हुतात्मा स्मारक – पोलीस स्टेशन-अंबालाल पटेल बिल्डींग – सरस्वती महाद्वार चौक – बस स्टँड – रेस्टहाऊस – धवड पेट्रोल पंप – यादव पेट्रोल पंप आणि दहन स्थळ
असा कार्यक्रम असणार आहे तेव्हा आपल्या घरासमोरून शवयात्रा जाईल तेव्हा पुष्पवृष्टी करावी तसेच या दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग आणि इतर गोष्टींचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments are closed.