Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसईत कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तीन ठार सात जखमी

तीन जणांचा मृत्यू, तर सात जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई 28 सप्टेंबर :-  वसई – विरार महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वाकी पाडा येथील कॉस पावर कंपनीतील सिलेंडर दुरुस्तीचे काम सुरू असतानाच हा भीषण स्फोट होऊन अपघात झाला. आजूबाजूचा परिसर दणाणून गेला.सर्वत्र धुरांचे लोट हवेत पसरले गेले. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आल्यानंतर हालचाल सुरू झाली. त्यात ३ जण मृत्यूमुखी तर ७ जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.

या कारखान्याचे किती नुकसान झाले याची माहिती मिळालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या त्यावेळी आग विझली होती, मात्र तापमान वाढलेले होते.असे सूत्रांनी सांगितले. ही कंपनी ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने महानगरपालिकेची ना-हरकत नाही. असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी पोहचले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.