Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रिलायन्सवरील मोर्चासाठी राज्यमंत्री बच्च कडू रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. २२ डिसेंबर : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू मुंबई येथे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चासाठी आज दि. २२ डिसेंबर रोजी रवाना झाले. राज्यमंत्री कडू यांना आज सकाळी उपराजधानीत अडविण्यात आले होते. त्यानंतर शासनाने दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ते विमानाने मुंबईला रवाना झाले.

 मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयावर धडक मोर्चासाठी राज्यमंत्री कडू सोमवारी दि. २१ डिसेंबर नागपूरमध्ये आले होते. ते सिव्हिल लाइन्समधील सिंचन विभागाच्या विश्रामगृहात थांबले होते. त्यानंतर ते आज मंगळवारी सकाळी विमानतळाकडे जाण्यास निघाले तेव्हा त्यांना पोलिसानद्वारे अडविण्यात आले होते. त्यांना अंदाजे तीन तास राज्यमंत्र्यांच्या ‘नजर कैद’त ठेवण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटनांच्या वतीने मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईला जाण्यासाठी मुंबईला निघाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी दोन पोलिस उपायुक्त व पोलिस निरीक्षकांसह प्रचंड ताफा तैनात करण्यात आला होता. ना. कडू यांच्या वाहनासमोरच पोलीस होते. त्यांनी पोलिसांना विचारणा केली तर पोलिसांनी विमानतळावर जाण्यापासून थांबवण्याचे आदेश असल्याचे सांगितले. तीन तास नजरकैदेत असल्याप्रमाणे ठेवण्यात आले. त्यानंतर ना. कडू यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास विमानाने जाण्यासाठी सोडण्यात आले. महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यावर तोडगा काढण्यास तयार नाही. वाटाघाटीतून निर्णय होत नाही. २५-३० शेतक-यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अंबानी यांनी आता पंतप्रधानांना समजवावे, यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. राज्यातील आघाडी सरकारचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असतानाही अडवण्यात आले. याकडे लक्ष वेधले असता, मला सरकारने थांबवले नाही तर, प्रशासन व पोलिसांचा काही गैरसमज झाला होता, असा दावाही ना. कडू यांनी यावेळी केला.

Comments are closed.