Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा ,चालक वाहकांचा समावेश,बेस्ट उपक्रमासाठी सांगली विभागातून गेले होते मुंबई.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क

सांगली 27 ऑक्टो 20 :-

सांगली विभागातून बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला गेलेले 106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत बेस्टसाठी सेवा देण्यास सांगलीतून २०० चालक, २०० वाहन आणि इतर २५ असे ४२५ कर्मचारी मुंबईला पाठवण्यात आले होते. दहा दिवसांची सेवा देऊन ते सांगलीत परतले. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी तब्बल 106 कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाची बाधा झालेल्या कामगारांमध्येसांगली 6, मिरज 6, इस्लामपूर 6, विटा 14,आटपाडी 15, जत 15, कवठेमहांकाळ 14,तासगाव 24 आणि शिराळा विभागातील ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाधित कर्मचाऱ्यांवर कोव्हिड सेंटर, रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.