Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पदाचा पदभार स्वीकारला..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती मुंबई 22, डिसेंबर :- मागील सव्वादोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंग यांची बृहन्मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूर येथील अप्पर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी काल आपल्या पदाचा पदभार पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या कडून स्विकारला.

आज सकाळी नवनियुक्त पोलीस आयुक्त आयुक्त कार्यालयात पोहचले त्यावेळी डीसीपी यांनी त्यांचे मुख्य प्रवेश द्वारावर पुष्पगुच्छ देत स्वागत केले. पोलीस विभागातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर मावळत्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी त्यांचे स्वागत करीत आपल्या पदाचा पदभार त्यांच्या कडे सोपविला. यावेळी त्यांनी अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात शांतता रहावी याकरिता आपण प्रयत्नशील राहणार आहोत सोबतच महिलांच्या सुरक्षेबाबत आणखी प्रयत्न करणार असून शहरातील अवैध धंदे, व्यापार यांच्यावर ताटाकल कारवाई करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.