Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेपणपल्ली अंतर्गत छल्लेवाडा येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 22, डिसेंबर :-  अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा गावातील नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७० लक्ष रु.निधी मंजूर करण्यात आले.या पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा छल्लेवाडा गावातील नाल्यावार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हस्ते उत्साहात पार पडला.

छल्लेवाडा येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता.मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतःनाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले होते.व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत तिमरम नाल्यावार पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी छल्लेवाडा येथील जनतेला दिलेल्या ग्वाही पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.अहेरी तालुक्यातील एकही नाल्यावर आजपर्यंत पूल वजा बंधारा बांधकाम करण्यात आले नाही.मात्र माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले तेंव्हा या नाल्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना ये -जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून दुसऱ्यादाच तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे.या पूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

या फुलवजा बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य, अजय नैताम,राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर अँड.एच.के.आकदर, विलास बोरकर,गुलाब देवगडे,शंकर बासरकर,लक्ष्मण झाडे,राहुल सुंदिला,अशोक झाडे,वागू निमगडे,लक्ष्मण जनगाम,मनोहर बासरकर,रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी,नागेश ताटिपेली,महेश भगत,हनमंतू ठाकरे,प्रशांत गुरनूले,श्रीनिवास लेंडगुरे,मोंडी कोटरंगे,स्वामी ठाकरे,वसंत चव्हाण,विलास सिडाम,वासुदेव सिडाम,सुरेश ठाकरे,किष्टाया गुरनूले,नारायण कोटरंगे,श्रीहरी गुरजाला,रवि चव्हाण,रवि सोतकु,रजित सभावा,सुरेश चव्हान, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक, नागरिक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

 

Comments are closed.