Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात ‘नो व्हेईकल डे ‘

महाविद्यालयात जाण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक आणि सायकलींचा वापर केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 16 जुलै :-  गोंडवाना विद्यापीठाने ग्रीन-कॅम्पस चळवळीचा एक भाग म्हणून महिन्याचा पहिला शनिवार, तिसरा शनिवार आणि पाचव्या शनिवारी विद्यापीठ परिसरात वाहनविरहित दिवस असेल असे गोंडवाना विद्यापीठाने ठरविले आहे. शनिवारी महाविद्यालयात जाण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक आणि सायकलींचा वापर केला. “पर्यावरणाचे संतुलन राखण्यास पूरक भाग म्हणून हवा प्रदूषण कमी होण्यास हातभार लावण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्याच्या दृष्टीने, नो व्हेईकल डे असावा हा यामागचा उद्देश आहे, असे कुलगुरू डॉ. प्रशांत श्री. बोकारे यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याचा पहिला शनिवार, तिसरा शनिवार व पाचवा शनिवार ‘नो व्हेकल डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

झाडे लावा झाडे जगवा हे वाक्य आपण नेहमी ऐकतो . पण वातावरणातील वायू प्रदूषणावर काही प्रमाणात का होईना मात करता यावी म्हणून ‘नो व्हेईकल डे’ पाळायला आज पासून सुरुवात झाली आहे. त्यानुषंगाने विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानापासून सायकलवर तर काहीनी पायी येत ‘नो व्हेईकल डे’ चा विद्यापीठात सुरू केलेला उपक्रम चांगला असल्याचे मत व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘नो व्हेईकल डे’च्या दिवशी आपले काम करण्याचे ठिकाण लांब असेल, तर पेट्रोलचा खर्च ऑटोरिक्षावर केला तर त्यांनाही सहज रोजगार प्राप्त होऊ शकतो. यामध्यमातून शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील. मनुष्यालाही मोकळा श्वास घेता येईल. वायू प्रदूषणामुळे होणारे आजार टाळता येईल. अनेकांना धुळीची ‘अ‍ॅलर्जी’ असते. दमाचा त्रास असतो. श्वसनाचे आजार असतात. त्यांना यातून एका दिवसासाठी का होईना, हायसे वाटेल. इंधनाची बचत व शहर निरोगी होईल महत्त्वाचे म्हणजे, इंधनाची बचत होईल. सायकल वा पायी प्रवास केल्यास शरीराचा व्यायाम होईल आणि आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. सर्वांगाने विचार केल्यास ‘नो व्हेईकल डे’ केवळ वायू प्रदूषणच टाळण्यासाठी नसेल, तर आपले आणि समाजाचे सोबतच शहराचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होईल. संघटना आणि संस्थाच्या माध्यमातून चार भिंतीच्या खोलीत विविध विषयावर प्रबोधन करण्यात येते. या प्रबोधनाची गरज असली तरी ते कृतीतून केल्यास त्याचा प्रचार आणि प्रसारही झपाट्याने होतो. भविष्यातील धोका टाळण्यासाठी आताच पुढाकार हवा त्यामुळेच वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.