Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आताची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई  11 नोव्हेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक  केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाड यांची चौकशी होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘हर, हर महादेव’ चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे, हे सरकार कोणाचे आहे हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.