Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात अण्णा हजारे यांचे पावित्र्य राखा : डॉ. शिवनाथ कुंभारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, ११ नोव्हेंबर :-  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षानी शासन, प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार दिसायला सुरुवात झाली. प्रत्येक क्षेत्रात होत असलेला भ्रष्टाचार सामान्य जनतेला बाधक ठरत असल्याचे अण्णा हजारे यानी बघीतलं म्हणून त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची स्थापना केली. राज्यभरातील शुध्द आचार, शुध्द विचार, निर्व्यसनी प्रामाणीक, निष्ठावंत व निष्कलंक जीवन जगणाऱ्या, तन, मन, धनाने सक्रीय सहभाग नोंदविनाऱ्या कार्यकर्त्यावर न्यासाची धुरा अवलंबून असून समाज हिताकरीता समविचाराने समाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्याच्या विश्वासावर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्य चालत आहे.अण्णा हजारेच्या आंदोलनातून माहितीचे अधिकार, ग्रामसभा , दप्तर दिरंगाई, बदली विनिमयाचा कायदा असे अनेक कायदे तयार झाले.

लोकायुक्त,लोकपालाचा लोकशाहीच्या मार्गाने लढा सुरु आहे. शासन, प्रशासनातील भ्रष्टाचार व नियमबाह्य कारभारा विरोधात लढा सुरु आहे.तेव्हा गावा गावात अण्णा हजारे यांच्या विचाराचे निपक्ष प्रामाणीक कार्यकर्ते जोडायला विसरु नका असे उद्गगार भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या ११ नोव्हेंबरच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये राज्य समिती विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वेळी गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे म्हणाले संघटनेत काम करताना न्यासाच्या विरुध्द कपटी बुध्दीने तथा लावालावी करुन कार्य करणाऱ्यांना वेळीच संघटेतून काढले जाईल. नैतिकतेच्या मार्गावर व न्यासाच्या ध्येय धोरणावर गडचिरोली जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्य सुरु असून अण्णा हजारे यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन केले जाईल.तेव्हा अण्णा हजारे यांचे कार्य लोकाभिमुख असल्याचे विजय खरवडे बोलत होते.

जिल्हा स्तरीय बैठकीला जिल्हा सचिव फुलचंद वाघाडे, जिल्हा उपाध्यक्ष पुंडलीक नागापुरे, गुड्डू दुर्गे, जिल्हा गडचिरोली तालुकाध्यक्ष रविजी शेलोटे, सुरेशजी पद्मशाली, शुभम खरवडे, गौरव लुथडे, ग्रामसेवाधिकारी सुखदेवजी वेठे, प्रा. विलास निंबोरकर, सहसचिव मनोज मशाखेञी,आरमोरी तालुका अध्यक्ष रवींद्र, हिराजी कुकुडकार, दोनाडकर, वडसा तालुका अध्यक्ष संतोष दुपारे,सचिव धनपाल कार,सिरोंचा तालुका अध्यक्ष संतोष मल्यालवार,मुलचेरा तालुका अध्यक्ष यशवंत मडावी,अहेरी तालुका अध्यक्ष सुखदेवे, धानोरा तालुका अध्यक्ष भगवान खोब्रागडे,एटापल्ली तालुका अध्यक्ष विलास चिटमलवार, कोरची तालुकाध्यक्ष जोत्सनाताई पारटवार, नाणाजी ठाकरे, चरणदासजी बोरकुटे, रामक्रिष्ण सहारे, विलास भानारकर, राकेश करंडे, विश्वनाथ मशाखेञी, राहुल उत्तरवार, राहुल ओंडरे, मनोज मशाखेत्री, जोगेश्वर मेश्राम, आनंदराव दुपारे, वासुदेव बुराडे, जयप्रकाश हर्षे, क्रुष्णा धानफोले, बबन सिलार, आशीर्वार ढोरे, गुणवंत सुरपाम ,बाळु राऊत, देवरावजी मोगरकर, राहुल वासनिक, रवि बारसागडे, हरीजी वालदे, यशवंत झरकर, दिवाकर चौधरी, मारोती दिवाकर भोयर, शाम कुथे, विठ्ठलराव बद्दखल, हिरालाल दुपारे, प्रभाकर सुर्यवंशी, नितीन खरवडे, संदीप वाघरे, योगेश झंजाळ दुषांत मंगर, सुरज मडावी, विवेक कामडे, कवडू झरकर, तथा जिल्हाभरातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. याच दिवशी ११ नोव्हेंबरला राज्य समिती विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे यांचा ७६ वा वाढदिवस असल्याने त्यांचे वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करुन महीला व बालकल्याण रुग्णालयात रुग्णाना फळे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. शिवनाथजी कुंभारे यांना शाल,श्रीफळ देऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा” देण्यात आल्या व त्यांना दिर्घायुष्याची कामना करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाची सुरवातीस महात्मा गांधीजीच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व माल्यार्पनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान खोब्रागडे, तर प्रास्ताविक फुलचंद वाघाडे यांनी केले.व आभार प्रदर्शन धनपाल कार यांनी मानले.

हे देखील वाचा :-

मनसेचे पीएसए पोर्ट विरोधात चक्का जाम आंदोलन

Comments are closed.