Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनसेचे पीएसए पोर्ट विरोधात चक्का जाम आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

  उरण 10 नोव्हेंबर :- प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य व प्रकल्पग्रत बाधीत मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पीएसए पोर्टचे गेट बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्त , मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे नेते पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि रायगड जिल्हा संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चौथ्यापोर्टचे गेट बंद आंदोलन करण्यात आले. यामुळे जवळपास एक ते दोन तास चक्का जाम झाला होता. अखेर येत्या काही दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरच चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पीएसए मुख्य अधिकाऱ्यांसमवेत संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी भेट मागितली होती. परंतु भेट देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसताच मनसेने चक्का जाम आंदोलन सुरू केले. यामुळे एक ते दोन तास चक्का जाम झाल्याने गाड्यांची भलीमोठी लाईन लागली होती. यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जक्का जाम आंदोलन सूरु झाल्याने न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी कंपनी व आंदोलनकर्ते यांच्यात मध्यस्थी करून येत्या तीन ते चार दिवसांत मनसे व कंपनी यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर जक्का जाम आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला.

या आंदोलनासाठी नाविक सेनेचे सरचिटणीस शेखर जाधव, अमोल तांबे,  उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत,  सचिव अल्पेश कडू, जिल्हाउपाध्यक्ष प्रविण दळवी , दिपक कांबळी, पनवेल शहर अध्यक्ष  योगेश चिले,  उपतालुकाध्यक्ष राकेश भोईर, मंगेश वाजेकर, रितेश पाटील विभाग प्रमुख बबन ठाकूर , अनिल गावंड, दिपक सुतार आदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.