Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२६ जूनच्या चक्काजाम व जेलभरो आंदोलनात ओबीसींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – ओबीसी नेते रमेश भुरसे यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समाप्त झालेले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या घटनादत्त अधिकारावर गदा आलेली आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी समाजाच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींवर अन्याय झालेला आहे. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप व असंतोष निर्माण झालेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व राज्य सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने २६ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.तरी ओबीसी समाज बांधवांनी या आंदोलनात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन ओबीसींचे नेते तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भोसले यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लसीकरण हेच कोरोना महामारीवर सर्वोत्तम उपाय – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली

 

 

 

Comments are closed.