Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजरी येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

गावात, वस्तीत घुसून वाघाचा हल्ला, जनतेत भितीचे वातावरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, 25 ऑक्टोबर :-  दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे मनुष्यावर होणारे हल्ले वाढले आहेत. रोजच कुठेना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनतेला अपले जीवन गमवावे लागत आहे. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण आहे. अशीच एक घटना माजरी येथे घडली असून वाघाच्या हल्ल्यात एक इसमाचा मृत्यू झाला आहे. दिपू सियाराम सिंग महतो (37) रा. न्यू हाफसिंग काॅलोनी असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दिपू सियारामसिंग महतो हा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता. रात्रपाळी असल्याने तो आपल्या न्यू हाउसिंग काॅलोनीच्या राहत्या घरून कामावर जात होता. त्यावेळी अचानक एक घरामाघे दबा धरून बसलेल्या वाघाने दिपू वर हल्ला चढवित त्याला फरफटत नेले. त्यामुळे दिपू घटनास्थळीत गतप्राण झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील काही दिवसांपासून हा वाघ वेकोली क्षेत्र व नागरी वस्तीत अनेकांना दिसला आहे. मात्र, वनविभाग व वेकोली प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असल्याचे म्हणत नागरिकांमध्ये संताप उमटला आहे. नागरी वस्तीत वाघाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त कराव अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

25 ऑक्टोबर :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.