Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘कंताराने’ रचला इतिहास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 25 ऑक्टोबर :-  ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा’ हा चित्रपट रोज नवा इतिहास रजत आहे. हा सिनेमॅटोग्र्राफी त्याच्या संबंधात नवव्या विक्रमाची स्थापना करण्यासाठी आला आहे. दिवाळीच्या वीकेंडमुळे चित्रपटाचे कलेक्शन खुपच वाढले आहे. चित्रपटाचे एकुण बाॅक्स ऑफिस कलेक्शन 170 कोटींवर पोहचले आहे.

‘कंतारा’ ने केजीएफ ला हरवले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘कंतारा’ चा चौथा आठवडा संपण्यापूर्वी 200 कोटींचा टप्पा पार करले असे म्हणण्यात येत आहे. ‘कंतारा’ ने कर्नाटक मध्ये आतापर्यंत 111 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यापैकी चौथ्या आठवड्यात 14 कोटी रूपयांची कमाई झाली आहे. जी केजीएफ च्या पूर्ण चौथ्या आठवड्याच्या दुप्पट आहे. यशच्या केजीएफ-2 या चित्रपटाने बाॅक्स ऑफिस वर प्रचंड कमाईचा विक्रम केला होता आणि कन्नडमध्ये कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आज ही पहिल्या क्रमांकावर आहे.

‘कंतारा’ला हिंदी भाषेत ही प्रेक्षकांचे मिळत आहे प्रेम

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कन्नड भाषेतील लोकप्रियता आणि यश पाहुन ऋषभ शेट्टीचा कंतारा हा चित्रपट 14 ऑक्टोबरला हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. तमिळ आणि तेलगूत 15 आणि मल्यामळ मध्ये 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हिंदी भाषेतही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

‘कंतारा’ या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, त्यात मिथक, दंतकथा आणि अंधश्रध्दा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कोणालाही रोमांचित करण्यास पुरेसे आहे. त्यांची कथा पवित्र रीतिरिवाज आणि परंपरा, लपलेले खजिना आणि पिढीतील रहस्यांवर आधारित आहे.

Comments are closed.