Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिमलगट्टा येथे गावविकास पॅनल ची एकहाती सत्ता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जिमलगट्टा, दि. २७ जानेवारी: जिमलगट्टा येथे गावविकास पॅनल ने एक हाती सत्ता मिळवली आहे. या ग्रामपंचायत मध्ये ११ सदस्य असून ग्रामविकास पॅनलचे ८ सदस्य निवडून आले त्यामुळे सदर पॅनलचे वर्चस्व निर्माण झाले असून सरपंच उपसरपंच सुद्धा याच पॅनलचे बनणार आहे. त्यामुळे जिमलगट्टा येथील युवा वर्गात आनंद संचारला आहे.

सदर पॅनल मध्ये सर्वच युवा उमेदवार आहेत तर काही उमेदवार प्रथमच रिंगणात उतरले व निवडून सुद्धा आले. यामुळे याचा दिग्गज उमेदवाराला फटका बसला गाव विकास पॅनलचे गावाच्या विकासाकडे विशेष लक्ष असणार असे पॅनलचे प्रमुख व उपसरपंच पदाचे उमेदवार वेंकटेश मेडी यांनी सांगितले. ‘गावाचा विकास हेच आमचे ध्येय आहे’. असे ग्रामविकास पॅनलचे म्हणणे आहे म्हणून खास युवा वर्गाने मेहनत घेऊन त्याचे विजयी उमेदवारास फळ दिले व ग्रामविकास पॅनलचे प्रमुख गावाचा विकास हेच माझं ध्येय गावचा कायापालट करणार व विकास गंगा आणणार असे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.