Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वांगेपली(गेर्रा) येथे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २७ जानेवारी: वांगेपली गेर्रा येथे जय पेरसापेन क्रिकेट मंडळ वांगेपली यांचा वतीने ग्रामीण टेनिस बाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ईश्वर सिडाम, दिलीप मडावी, अमित देशपांडे, महेश नैताम, राजू सिडाम, सडमेक ताई, बाबूराव नागापूरे, साईनाथ सड़मेक आदि मान्यवरांची उपस्थिति होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मंडळचे अध्यक्ष समीर मडावी, उपाध्यक्ष रिजवान सिडाम, सचिव शैलेश मडावी, कोषाध्यक्ष कपिल आत्राम, विनोद पोरतेट, पिंकू मडावी, रूपेश मडावी, गणेश मडावी, मिथुन सिडाम, प्रभाकर मडावी, राकेश सिडाम, रतन मडावी, राजू सिडाम, मनोज मडावी, विशाल मडावी, विकास मडावी, अक्षय कुसराम, समीर मडावी, सतीश सडमेक, जीवन मडावी, तिरुपती तलांडे, अजय मडावी, प्रदीप सिडाम, अरुण सिडाम, राहुल मडावी, अविनाश तालांडे, संदीप मडावी, दीपक सिडाम, गोपाल सिडाम, अमोल तलांडे, सचिन सिडाम, रजनीकांत मडावी, दिनेश मडावी, मनोज मडावी, राहुल मडावी, सागर मडावी, प्रशांत मडावी व पदअधिकारी गावातील महिला नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर सडमेक यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पिंटू तोडसाम तर आभार कैलाश आत्राम यांनी केले.        

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.