Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गांगुलीला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सात जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोलकाता, 27 जानेवारी : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना छातीमध्ये दुखत असल्यानं पुन्हा एकदा कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गांगुली यांना या महिन्याच्या सुरुवातीला हार्टअटॅक आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. “गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे,” असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.