Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

म्युकरमायकोसिसमुळे डोळा गमावल्याने उचलले टोकाचे पाऊल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर : आधी कोव्हिड आणि नंतर म्युकरमायकोसिसने ग्रासल्यानंतर डोळा निकामी झालेल्या पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलने गुरुवारी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. प्रमोद मेरगुवार असे या हवालदाराचे नाव आहे. झिंगाबाई टाकळी येथील पोलिस कर्मचारी निवासस्थान परिसरात ही घटना घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) मध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले प्रमोद मेरगूवार यांना काही दिवसांपूर्वी कोव्हिडचे निदान करण्यात आले होते. कोव्हिडवरील उपचारानंतर त्यांनी यावर मातही केली होती. मात्र त्यानंतर त्यांना म्यूकरमायकोसिस या काळ्या बुरशीचे संक्रमण झाले होते. त्यामुळे प्रमोद मेरगुवार यांचा एक डोळाही निकामी झाला होता. त्यामुळे प्रमोद गेल्या काही दिवसांपासून अंधत्व आल्याने नैराश्यात गेले होते.

पोलिस कर्मचारी निवाससंकूल परिसरात गोळी झाडल्याचा आवाज येताच काही जण त्यांच्या निवासस्थानी धावले. मात्र तोवर घात झाला होता.

याची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करीत तो उत्तरीय तपासणीसाठी मेयोकडे पाठविला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कन्या वन समृद्धी योजना आणि रानमळा योजनाची रोपे वाटप

चंद्रपूर जिल्ह्यात आज १ मृत्युसह २६ कोरोनामुक्त, २३ पॉझिटिव्ह तर १ मृत्यु

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.