Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कन्या वन समृद्धी योजना आणि रानमळा योजनाची रोपे वाटप

सामाजिक वनीकरण गडचिरोली विभागाअंतर्गत येणाऱ्या अहेरी, वडसा, गडचिरोली वनपरिक्षेत्रातील शेतकऱ्यांना रोपे वाटप करून दिली योजनेची माहिती. विभागीय वनाधिकारी सोनल भडके यांचा सक्रियतेने पुढाकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ग्राम पंचायत आणि वन विभागाच्या संयुक्त कार्यक्रमातून कन्या वन समृद्धी योजना आणि रानमळा योजने मार्फत रोपे वाटप केली जातात. वृक्षलागवडीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात जनतेचा जास्तीत जास्त सहभाग मिळवून वनांबाबत तसेच वृक्षारोपणाबद्दल स्थानिक जनतेत आवड निर्माण व्हावी आणि वृक्षलागवडीतून पर्यावरणाचा समतोल राखला जावा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय वननीतीनुसारचे, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यासाठी वन विभागाकडून लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेऊन नवनवीन योजना तयार करण्यात येतात व या योजना राबविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते. कृषीप्रधान असणाऱ्या आपल्या भारत देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक खेडयात राहतात आणि शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. शेतकऱ्यांच्या घराजवळ परसदारी उपलब्ध असणारी रिकामी जागा, शेतामधील बांधांवर उपलब्ध असणारी जागा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची खाजगी पडीक जमीन वृक्षलागवडीसाठी उपलब्ध होऊ शकते याचाही या योजनेमध्ये विचार करण्यात आला आहे.

वैश्विक तापमानवाढीचे संकट, त्यामुळे निसर्गामध्ये झालेले मोठे फेरबदल, ऋतूबदलामुळे पावसाचा लहरीपणा, गारपीट/वादळ/अवकाळी पाऊस/ढगफुटी/अतिवृष्टी/महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण इ. कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने समाजातील सर्व घटकांचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग घेऊन जास्तीत जास्त झाडे लावणे अपेक्षित आहे. या सर्व बाबींचा विचार करुन कन्या वन समृध्दी ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत अतिमागास व नक्षलग्रस्त ओळख असलेल्या भागात डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली, एस. डी. वाढई, सामाजिक वनीकरण वनसंरक्षक, नागपूर, यांच्या मार्गदर्शनात सोनल भडके, विभागीय वनाधिकारी गडचिरोली, यांच्या कार्यक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम, नितीन हेमके, हिरालाल बारसागडे यांनी अहेरी, वडसा, गडचिरोली वनपरीक्षेत्रात उत्स्फुर्तपणे रोपे वाटप केली. या तीनही विभागातील वनपरिक्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत अहेरी, चांभारडा, अमिर्झा, खुसी, मारोडा, मूळझा बु, जांभूळखेडा, रांगी, कलामगाव, जगदा, मोहाली, कन्हाळगाव, चिगली, नवरगाव आदी. गावांमध्ये हा कार्यक्रम योजनेची माहिती देऊन सक्रीयतेने राबविण्यात आला.

 

“कन्या वन समृद्धी योजना” आणि “रानमळा योजना” राबवून रोपे वाटप केली जातात. या योजनेचे उद्धिष्ट वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शासनाने कन्या वन समृद्धी योजना व रानमाळा योजना सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या परिवारात मुलगी जन्माला आली तर कन्या वन समृद्धी योजना राबविण्या साठी स्थानिक ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव, सदस्य मुलगी झालेल्या परिवाराचे स्वागत करून शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत १० फळाचे रोपे लागवड करण्यासाठी देत असतात. तर तिच्या भविष्यात फळांच्या झाडामार्फत जे उत्पादन घेऊन  त्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिकरित्या समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमिका बजावता येणार आहे. तर रानमळा योजना ही परिवारातील मृत्यू, आनंदाक्षणी त्यांच्या आठवण म्हणून वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करून आठवण सदैव समोर ठेवायचे आहे. या दोन्ही योजनेतून आर्थिकरित्या सक्षम व आठवणही स्मरणात राहणार असून वातावरण संतुलन ठेवण्यास मदत होणार आहे.

डॉ. किशोर मानकर – वनसंरक्षक गडचिरोली

 “कन्या वन समृद्धी योजना” काय आहे?

ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला 10 रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे: वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणने, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इ. बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे तसेच मुलीच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये 5 रोपे सागाची/ सागवान जडया, 2 रोपे आंबा, 1 फणस, 1 जांभूळ आणि 1 चिंच अशी रोपे असतात.

भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्याफळांच्या रोपांचा समावेश असतो. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकन्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा आहे. वरील योजना ज्या शेतकन्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 मुली जन्माला येतात व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते त्यांच्याच पुरती मर्यादित असून. 1 मुलगा किंवा 1 मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.

“रानमळा योजना” काय आहे?

जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतुबदल, पाण्याचे दुर्भिक्ष अतिवृष्टी व पुरावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सरकारी पातळीवर हाती घेण्यात आला आहे. पुणे जिह्यातल्या खेड, राजगुरूनगर तालुक्यातील रानमळा गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. या योजनेमध्ये आनंद साजरा करण्यासाठी या गावातील ग्रामस्थांकडून घराच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत, परसबागेत किंवा शेतीच्या बांधावर झाडांची खास करून फळझाडांची लागवड करण्यास सुरुवात केली. एखाद्या घरात जन्माला येणाऱ्या बालकाच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी गावात जन्मवृक्ष लावण्यास सुरुवात झाली. त्यासाठी ग्रापपंचायतीकडून फळझाड देण्यास सुरुवात केली. या रोपाचे संवर्धन व जतन करण्यास संबंधित घरातल्या कुटुंबातील सदस्यांनी सुरुवात केली.

आनंदोत्सव स्मरणात राहण्यासाठी केली जाते वृक्षाची लागवड.

लग्न झाल्यावर ‘शुभमंगल वृक्ष’ व ‘माहेरची साडी’ अशी योजना राबवली. विवाहित मुलींच्या माहेरच्या मंडळींना वृक्षांची-फळझाडांची रोपे देऊन मुलीच्या अनुपस्थित आपल्या लेकीप्रमाणे माया देऊन त्या झाडाची जोपासना-संवर्धन करण्यास सुरुवात झाली. विद्यार्थी दहावी-बारावी किंवा उत्तीर्ण झाल्यास अथवा नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी झाड लावण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचातच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर आनंद द्विगुणित करण्यासाठी वृक्षारोपण करण्याची प्रथा सुरू झाली.

 

हे देखील वाचा  :

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामूळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात – चंद्रशेखर बावनकुळे

धक्कादायक! ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 

 

Comments are closed.