Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २६ नोव्हेंबर : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान आणि २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि त्यांतर्गतच्या ७ पंचायत समित्यांच्या १०४; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ आणि त्यांतर्गतच्या ८ पंचायत समित्यांच्या १०६ जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नामनिर्देशनपत्रे १ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील.

५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या जि. प. आणि पं. स. ची नावे :

भंडारा जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर. गोंदिया जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी.

हे देखील वाचा :

शालेय विद्यार्थ्यांनी रॅली मार्फत मतदारांमध्ये मतदानविषयक केली जनजागृती

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु, शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड

मिठाई खाताय… तर सावधान, केमिकलने बनवलेला लाखो रुपयांचा बनावट खवा जप्त…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.