Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत दूरसंचार निगम लिमिटेड मार्फत पुरविण्यात येत असलेल्या फायबर नेटवर्क सर्व्हिसचा भोंगळ कारभार..

ग्राहकांची सेवा कोमात तर स्थानिक प्रतिनीधीची मुजोरी जोमात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

आलापल्ली, 19 जुलै : भारत दूरसंचार निगम लिमिटेड मार्फत पुरविण्यात येत असलेल्या फायबर नेटवर्क सर्व्हिस पुरविण्यात येणाऱ्या सेवा पुरवठा धारकाकडून नेटवर्क सर्व्हिस देण्यास टाळाटाळ होत असल्याचे आलापल्ली परिसरात दिसून येत आहे. तसेच ह्या संदर्भात वरिष्ट कार्यालयाशी तसेच स्थानिक प्रतिनीधीशी संपर्क करतांना कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रतिनीधी उडवा उडवीची उत्तरे देत दहा वेळा येजा करून सेवा पुरविणे शक्य नाही व मला एकच काम नसल्याचे सांगून बतावणी केली जात आहे.

फायबर केबल पुरवठा धारकाकडून सेवा पुरविण्यास त्रास होत असेल तर फायबर नेटवर्कचे कनेक्शन काढून टाका अशी थेट धमकीच देत ग्राहकांची दमदाटी केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या समस्या मांडल्यावर स्थानिक केबल  नेटवर्क प्रतिनीधी कडून अशा प्रकारची धमकी ग्राहकांना मिळत असल्यास ऑनलाइन माध्यमातून नियमित करण्यात येणारे कामे कसे करायचे ? असा प्रश्न स्थानिक जनतेसह , ग्राहकांना पडला आहे.ग्रामस्थांना सुद्धा अश्या गैरसेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात ग्राहकांनी स्थानिक प्रतिनीधीशी संपर्क करून आपल्या अडचणी व्यक्त केल्या असता मीच या आलापल्ली परिसराचा बॉस असून माझ्या मनाला वाटेल तेव्हा काम करेल माझ्या संदर्भात आपण वरिष्ट कार्यालयाला तक्रार केली असल्याने मी माझ्या इच्छेने 72 तासानंतर सेवा देईन असे बोलून ग्राहकांची पिळवणूक झाल्याचे फायबर केबल धारकाचे तक्रारीत म्हटले आहे. वेळोवेळी  ग्राहकांनी समजूत  काढण्याचा प्रयत्न केला मात्र केबल पुरवठादार मुजोरी करीत असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली परिसरात योग्य ती सेवा पुरवठदार प्रतिनिधी  यांच्या कडून ग्राहकांना  होत नसेल तर आपल्या सेवेचा काय उपयोग , नियमितपणे बिल भरल्यानंतर सुद्धा सुरळीत सेवा मिळत नाही. शासनाने सगळी कामे ऑनलाइन केली जातात मात्र  नेटवर्क  नसल्यानें ऑनलाइन कामांचा खोळंबा होतो.

सध्या अल्लापल्लीत सेवा पाहिजे तशी मिळत नसल्याने ऑनलाइन कामे करणाऱ्या विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्त तसेच पीक विमा संदर्भात काम करणारे शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे. अशी तक्रार आलापल्ली वासियांनी वरिष्ट कार्यालयाला केली असून लवकरात लवकर आम्हाला योग्य सेवा पुरविण्यात यावी तसेच आमच्या तक्रारीची दखल घेऊन आपल्याकडून नेमणूक करण्यात आलेल्या प्रतिनिधीवर योग्य ती कारवाई करावी व सुरळीत सेवा देण्यात यावी अशी मागणी तक्रारीत केली असून वरिष्ट कार्यालय काय  कारवाई करुन न्याय मिळवून देणार याकडे स्थानीक ग्राहकांचे लक्ष लागले आहे..

 

लोकस्पर्श न्यूज वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने भारत दूरसंचार निगम लिमिटेड अहेरी येथील  कार्यालयात भ्रमध्वनीद्वारे संपर्क साधला असता कॉल रिसिव्ह केला नसल्याने अधिक माहिती घेता आली नाही..

हे पण वाचा :-

Comments are closed.