Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन. दानवे यांचा डीएनए चेक करा – नारायण गजर

Get real time updates directly on you device, subscribe now.

विजय साळी – जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ११ डिसेंबर: शेतकऱ्यांच्या आंदोलना विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तसेच दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज जालन्यात प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालना शहरातील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं .आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यानी दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
“शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असे म्हणणाऱ्या दानवे यांचा डीएनए चेक करा.” असे यावेळी नारायण गजर यांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर हल्लाबोल केला.

“शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असे म्हणणाऱ्या दानवे यांचा डीएनए चेक करा.” असे यावेळी नारायण गजर यांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर हल्लाबोल केला.
“रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर पाच-पाच वेळेस निवडून आलेले खासदार अशाप्रकारे वेळोवेळी शेतकऱ्यांची अवमानना करीत आहेत”.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.