हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास
वृत्तसंस्था, दि. ११ डिसेंबर : एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ही टेस्ट राष्ट्रीय क्रिकेट एकॅडमीमध्ये घेण्यात आली. या टेस्टदरम्यान एनसीएप्रमुख राहुल द्रविड उपस्थित होता.
दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत स्थान मिळाले नव्हते. मात्र आता रोहितने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Comments are closed.