लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 27 जून – भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची फायनल आहे. आज वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर होत असताना सर्वांच लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे.
8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कोलकाता आणि मुंबई येथे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, तर अहमदाबाद येथे फायनल होणार आहे.
GET YOUR CALENDARS READY! ????️????
The ICC Men's @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/dakTklwcYe
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 27, 2023
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा थरार रंगणार आहे. या सामन्याला एक लाख प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.