Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ५, ठाणे वन विभागात सिसीएफ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक..?

तक्रारी नंतर ही कारवाई साठी का विलंब..?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ठाणे, 19 जानेवारी-  ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालय सध्या भ्रष्ट आणि नियमबाह्य कारभारामुळे चर्चेत आहे.या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे यांच्या दबावापुढे चक्क मुख्य वनसंरक्षक के प्रदीपा यांना ही तोंड गप्प करुन बसावे लागत आहे.यामुळे या कार्यालयाचा कारभार प्रशासकीय अधिकारी गिऱ्हे चालवत असल्याची चर्चा सध्या वन विभागात आहे.

ठाणे मुख्य वासंरक्षक कार्यालतील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांच्या बदल्या,भरती,कार्यालय ऑडिट, विभागीय चौकशी यामधील आर्थिक वसुली बाबत सामजिक संस्थानी थेट मुख्यमंत्री,वनमंत्री,वन विभाग सचिव यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर ठाणे सिसीएफ यांनी सोपान गिऱ्हे हे प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांची चौकशी मंत्रालय स्तरावर करण्यात यावी यासाठी आजतागायत कळविलेले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सी.सी.एफ.कार्यालयात नक्की बॉस कोण..?
मुख्य वासंरक्षक कार्यालयात सोपान गिऱ्हे प्रशासकीय अधिकारी असले तरी आपणच या कार्यालयाचे बॉस असल्यासारखे वागत असून, अपली नागपूर,मंत्रालय येथील बड्या अधिकाऱ्यांपर्यात पोहच असल्याचे दाखवत आहेत. यामुळे सध्याच्या सिसीएफ के प्रदीपा गिऱ्हे यांना घाबरुन कारवाई करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यास घाबरत असल्याची चर्चा वनविभागात दबक्या आवाजात सुरु आहे.प्रशासकिय अधिकारी सोपान गिऱ्हे यांनी बॉसगिरी करत मुख्यालयात आपल्या काही बगलबच्चांना एकच टेबल वर कायम सेवेत ठेवत या कार्यालयाचा ताबा मिळविला आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात जाण्याची साधी हिंमत ही कोणी करत नाही.सामजिक संस्थांच्या तक्रारी नंतर लोकस्पर्श ने श्री गिऱ्हे यांच्या कारभारा बाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत गिऱ्हे यांच्या भ्रष्ट कारभार बातम्यांद्वारा मांडला मात्र याची ही दखल घेण्यास सिसीएफ प्रदीपा यांनी हिंमत केली नाही. नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात याबाबत माहिती घेतली असता प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी ही कार्यवाही च्या सूचना दिल्या मात्र त्याला ही फाटा फोडण्याचे काम गिऱ्हे यांनी सिसीएफ के. प्रदीपा यांच्यावर दबाव आणत केले आहे.

दबावामुळे तक्रार दाखल करण्यास कर्मचाऱ्यांमध्ये भीती
सिसीएफ यांच्यावरील दबावामुळे अन्याय झालेला कर्मचारी ही गिऱ्हे यांच्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नाही.उलट आपल्यावरच कारवाई होईल, गिऱ्हे यांना पदावरुन हटविण्याची हिंमत कोणामध्ये नाही अशी समज आता कर्मचाऱ्यांमध्ये झाल्याने वनरक्षक,वनपाल,लिपिक लेखापाल यांनी मुग गिळून गप्प बसणे ठरविले आहे. याचाच फायदा घेत सोपान गिऱ्हे यांच्या वसुलीचा पट्टा सुरुच आहे. ठाणे विभागात आता लिपिक,लेखापाल,वनरक्षक यांची मोठी भरती सुरु आहे. ही भरती प्रशासकीय अधिकारी गिऱ्हे यांच्यासाठी पैसे वसुलीची सुवर्ण संधी असल्याची चर्चा वनविभागात होतेय.सोपान गिऱ्हे हे येत्या मे महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. कमी कालावधी असल्याने त्यांनी आर्थिक वसुलीचा फ्लो ही वाढविल्याची चर्चा होतेय.सेवा निवृत्तीपुर्व अश्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत कोणी करणार का? वन विभागातील या बॉसगिरीला थांबविण्यासाठी आणि अश्या भ्रष्ट कर्मचाऱ्यामुळे होणाऱ्या शासनाच्या बदनामीसाठी वनमंत्री स्वतः कारवाई करण्याची तयारी दाखवतील का ? अशी विवंचना कर्मचारी सध्या व्यक्त करत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

भ्रष्टाचाराचे कुरण भाग : ३ वसुलीसाठी नियमबाह्य नियुक्ती..? वन विभागात होतेय “यांच्या” नावाची चर्चा..

Comments are closed.